मुंबई: क्रिकेटपटू मिताली राजच्या आयुष्यावर बेतलेला ‘शाबाश मिथू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या अभिनयाची चर्चा होत असताना मराठमोळ्या अभिनेत्रीही कौतुक होतंय. अभिनेत्री तितीक्षा तावडे हिनं या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिनं प्रचंड मेहनत केल्याचं अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. पण बॉलिवूड चित्रपटात भूमिका मिळवणं वाटतं तितकं सोपं नसलं असं ती म्हणतेय.
बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार कतरिना कैफची वहिनी
तितीक्षा मालिकाविश्वात विविध भूमिका साकारत घराघरांत पोहोचले. पण बॉलिवूड चित्रपटात भूमिका मिळवण्याठीचा हा प्रवास मात्र परिक्षा घेणारा ठरतो, असं ती सांगतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं ‘शाबाश मिथू’च्या ऑडिशनचे किस्से सांगितले. या चित्रपटात भूमिका मिळण्याचा अनुभव सहज सोपा नव्हता. चित्रपटासाठी आठ महिने मी ऑडिशन देते होते. भूमिकेसाठी माझी निवड होणार की नाही हे देखील तळ्यात मळ्यात होतं. पण मी ऑडिशन देणं थांबवलं नाही. करोनाच्या काळात हे सोपं नव्हतं. वेगवेगळ्या पद्धतीनं मी आठ महिने ऑडिशन देत होते. आठ महिन्यानंतर भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचं मला सांगण्यात आलं, असं तितीक्षा सांगते.
राहुल वैद्यची दिशाबरोबर रोमँटिक डेट, विमानात किस करतानाचे Photo झाले Viral
तसंच चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर तितक्षानं जवळच्या मैदानावर जाऊन प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. अनेक वर्षांनी क्रिकेट खेळत असल्यामुळं विशिष्ट पद्धतीनं चालण्याची, बोलण्याची, व्यायामाची तिनं सवय करून घेतली. यादरम्यान नोशीन अल खदिर आणि इतर प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या सान्निध्यात राहून तितीक्षा आणि इतर कलाकारांनी प्रशिक्षण घेतलं. ‘मी क्रिकेटपटू असते तरीही आता मला जितक्या प्रसिद्ध लोकांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला मिळतंय ते कदाचित मिळालं नसतं. त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते’, असं ती सांगते.


चित्रपटाचा काही भाग लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर चित्रित झाला. त्या अनुभवाबद्दल तितीक्षानं सांगितलं, ‘लॉर्ड्सला चित्रीकरण करणं हे एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालंय यावर अजूनही विश्वास बसत नाही. लॉर्ड्सची बाल्कनी, पायऱ्यांवर असलेले दिग्गज क्रिकेटपटूंचे फोटो, मोठं मैदान हे सगळं अगदी स्वप्नवत वाटत होतं. चित्रीकरण झालेला दिवस माझ्या स्मरणात कायम राहील.’

दोन वेळा झाला मेंदूशी संबंधित जीवघेणा आजार, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
तितीक्षा शाळेपासूनच क्रिकेट खेळत असल्यामुळे ‘शाबाश मिथू’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिनं शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं. तापसीबरोबर काम करताना तिचा आत्मविश्वास, कोणालाही आपलंसं करायची वृत्ती आणि टीममध्ये लागणारं बाँडिंग टिकवून ठेवणं हे तिच्याकडून शिकायला मिळाल्याचं तितीक्षा सांगते. या चित्रपटात आधी तितीक्षा नोशिन अल खदिर यांची भूमिका साकारणार होती; पण काही अडचणींमुळे ती आता खुशी हे काल्पनिक पात्र निभावणार आहे. तितीक्षा ही व्यक्तिरेखा कशी निभावते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here