हिंगोली : राज्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा लाखो हेक्टर पिकावर सध्या टांगती तलवार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नुकत्याच पेरलेल्या कोवळ्या पिकांना फटका बसला आहे. पिकांत पाणी साचून राहत असल्यामुळे तूर, सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग ही पिके पिवळी पडू लागली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर तीन दिवस उघडीप दिल्यानंतर रविवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे पिकामधील अंतरमशागतीचे काम खोळंबले असून पिकांमध्ये वाढत चाललेल्या तणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात पिके लहान अन् तण मोठे असे चित्र दिसू लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ ३४ हजार ७७५ हेक्टरवर तुर, ५९०८ हेक्टरवर मुग तर ४३४० हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ २९ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या पिकांमध्ये अद्याप अंतरमशागतच झाली नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची उघडीपीची प्रतीक्षा लागली आहे.

rain in hingoli district

हिंगोलीत जिल्ह्यात शेतांमध्ये पाणीच पाणी…

क्षणात संपवले तीन वर्षांचे प्रेमसंबंध, मुलाकडचे नाही म्हणाले म्हणून प्रेयसीचं धक्कादायक कृत्य

हिंगोलीत सरासरी ५१६ मि.मी पाऊस

जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ३९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरी ५१६ मिलीमिटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ६० टक्के आहे. पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर, सिद्धेश्वर, येलदरी ही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर विहीर, तलाव, पाझर तलाव, नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

हिंगोलीत पावसाचं रौद्ररूप: जनजीवन विस्कळीत; पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here