मालिकेत लवकरच मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आमदार देवयानी गायकवाड हिनं तिच्या नवऱ्याचा खून करण्यासाठी डॉक्टरला सुपारी दिली होती. पण डॉक्टरनं तिच्या नवऱ्याचा खून केला नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलिस आणि मार्तंड जामकर देवयानी गायकवाड हिच्या बेपत्ता नवऱ्याचा शोध घेत असतात. आता देवयानी गायकवाड, डॉक्टर आणि जामकर एकमेकांच्या समोर येणार आहेत. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलाय.
तसंच मार्तंड जामकरला डॉ. अजित कुमार देव याच्या मुंबईतील हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाल्यानंतर तो तिथं पोहोलाय. तिथं त्याला डॉ. अजित कुमारची गर्लफ्रेंड भेटली आहे . डॉ. अजित कुमारचा मृत्यू झाल्याचं ती जामकरला सांगते. आता ती देखील कातळवाडीत येणार आहे. त्यामुळं मालिकेत नेमकं काय घडणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
सोशल मीडियावर या प्रोमोची चर्चा सुरू आहे. हा प्रोमो पाहून डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळीही तो यातून बाहेर पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कथानकावरून मालिकेचा शेवट जवळ आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मालिका निरोप घेणार का? असं चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.