अमरावती : सिंभोरा धरणावरून डवरगाव येथे दुचाकीवर परत येतांना एका भरधाव ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चीचखेड फाट्यावर घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, या दुचाकीवर असलेल्या मामा-भाच्याचा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल नाकाडे ( वय ३४) व आशिष ठाकरे ( वय २४) रा दोघेही डवरगाव असे घटनेत ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघेही डवरगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी राहुल नाकाडे नजीकच्या रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत असून माजी ग्रामपंचायत सदस्य देखील होते. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने राहुल नाकाडे आणि त्यांचा भाचा आशिष ठाकरे यांनी सिंभोरा धरणावर जाण्याचा बेत आखला. दोघेही सकाळी निघाले आणि धरणावरील आनंद घेऊन परत घराकडे यायला निघाले. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान दोघेही त्यांच्या दुचाकीने चीचखेड फाट्यानजीक आल्यावर मागच्या बाजूने येणाऱ्या ट्रक क्र. युपी ७० एफटी ६६४२ ने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पार चक्काचुर झाला तर दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि त्यांचा अपघाता करूण अंत झाला.

VIDEO | लग्न झाल्यावर काहीच नाही केलं, तर पोरं कशी होणार? इनिशिएटिव्ह घ्यायला हवा : गडकरी
राहुल नाकाडे आणि आशिष ठाकरे दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी तातडीने दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सोमवारी दुपारी दोघांवरही डवरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

मुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचे दोन अजेंडा कोणते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here