लोकांच्या समोरच सराफा व्यवसायिकाला बोलावून शिवलिंगाचं वजन करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश पांडेंनी सांगितलं. हे शिवलिंग नेमकं कोणत्या परिसरातलं आहे आणि ते घाघरा नदीतून मऊपर्यंत कसं आलं, याचा तपास विशेष यंत्रणा करत आहेत. संपूर्ण तपास झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अन्य कोणतीही माहिती समोर न आल्यास जिथे शिवलिंग सापडलं, तिथल्या लोकांना ते परत करण्यात येईल. मात्र त्याआधी तपास यंत्रणा त्यांचं काम करतील, अशी माहिती पांडेंनी दिली.
राममिलन निषाद नावाचा व्यक्ती घाघरा नदीत स्नान करत होता. पूजा पात्र धुण्यासाठी तो नदीतून वाळू काढत होता. त्यावेळी खाली काहीतरी मोठी वस्तू असल्याचं त्याला जाणवलं. मग त्यानं तिथे खोदकाम सुरू केलं. राममिलन यांनी तिथेच मासेमारी करत असलेल्या रामचंद्र निषाद यांना मदतीसाठी बोलावलं. दोघांनी मिळून तिथे खोदकाम केलं. हाती शिवलिंग दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी शिवलिंग घरी आणलं. जवळच्या मंदिरातील पुजाऱ्याला त्यांनी याची माहिती दिली. मग शिवलिंग मंदिरात नेण्यात आलं. तिथून ते पोलीस ठाण्यात नेलं गेलं.
shivling found in river, नदीत सापडलं तब्बल ५३ किलो चांदीचं शिवलिंग; पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली अन् मग… – 53 kg silver shivling emerged from the ghaghara river in mau up crowds gathered to worship
मऊ: उत्तर प्रदेशच्या मऊमधील घाघरा नदीत एक चांदीचं शिवलिंग सापडलं आहे. एका तरुणाला नदीत शिवलिंग दिसलं. ही बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शिवलिंग पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. अनेक श्रद्धाळूंनी शिवलिंगाची पूजा केली.