किशोर पाटील, जळगाव : चार दिवसांपूर्वी मुलगी पाहण्यासाठी तो इंदोर इथं गेला. मुलगी पाहिली, पसंतही पडली. इतकंच नाहीतर काल मानपानाचा कार्यक्रमही पार पडला. पण आज मात्र तरुणावर काळाने घाला घातला. आज आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसर इथं परतत असताना तरुणाचा मृत्यू झाला. इंदोरहून जळगावमध्ये येणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याने या दुर्घटनेमध्ये तरुणानेही आपले प्राण गमावले.

अविनाश संजय परदेशी वय २५ रां. पाडळसरे तालुका अमळनेर असं या मयत तरुणाचं नाव आहे. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना आज घडली. या घटनेत अमळनेर तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात मयत अविनाश परदेशी या तरुणाचा समावेश आहे.

Bus Falls into Narmada River : इंदौरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू
अविनाश हा त्याच्या आईसोबत पाडळसरे या गावात राहत होता. कपडे आणून ठेवणे व ते प्रेस करून देणे असा त्याचा व्यवसाय होता. यावरच त्याच्या उदरनिर्वाह भागवत होता. अविनाशचा लहान भाऊ अजय आणि त्याची मावशी मीना परदेशी हे इंदोरमध्ये राहतात. मावशी आणि लहान भावाने अविनाशला लग्नासाठी मुलगी पाहिली होती.

ही मुलगी पाहण्यासाठी अविनाश चार दिवसांपूर्वी पाडळसरे इथून इंदोर इथे गेला होता. अविनाशने मुलगी बघितली. दोघांची पसंतीही झाली आणि काल रविवारी मानपानाचा कार्यक्रमही पार पडला. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आज इंदोर अंमळनेर बसने अविनाश हा गावी येण्यासाठी निघाला. त्याची मावशी आणि लहान भावाने त्याला बसमध्ये बसवलं. मात्र, पुढे काय अनिश्चित घटना घडेल हे कुणालाच ठाऊक नव्हतं. मध्य प्रदेशातील एका पुलावरून बस थेट नर्मदा नदी पात्रात कोसळली. या घटनेत बसमध्ये बसलेल्या अविनाश याचाही मृत्यू झाला.

पुणे हादरलं! स्कूल बस चालकाचं धक्कादायक कृत्य, अल्पवयीन मुलीला रिलेशनशिपबद्दल समजवलं आणि…

दरम्यान, बसमध्ये बसवल्यानंतर अविनाश याच्या लहान भावाने फोनवरून आई संगीता हिला अविनाश याला बसमध्ये बसवण्याची माहिती दिली होती. तसेच बसचा क्रमांकही सांगितला होता. दरम्यान, गावात नर्मदा नदीच्या पात्रात अमळनेर आगाराची बस कोसळल्याची माहिती अविनाशची आई संगीता हिला मिळाली. त्यानुसार, संगीता यांनी याबाबत लहान भाऊ अजय यास कळवलं. अजयने तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता ती खरी निघाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाची आई व त्याचे गावातील नातेवाईक हे तातडीने इंदोरकडे रवाना झाले आहेत.

MP Bus Accident: नर्मदा नदीत कोसळलेली बस इंदौरहून जळगावला निघाली होती, एसटी महामंडळाकडून हेल्पलाईन नंबर जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here