इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करता शिखर धवन फक्त एकाच धावेवर बाद झाला होता. या मालिकेत धवन भारतीय संघात परतला होता. पण त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही. भारताने तिसऱ्या सामन्यात दमदार विजय साकारला आणि त्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात झाली. पहिल्यांदा रोहित शर्माच्या हातात विजयाचा चषक देण्यात आला. रोहित त्यावेळी संघाबरोबर फोटो काढण्यासाठी स्टेजवर आला आणि तिथेच हा प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले.
रोहित जेव्हा चषक घेऊन स्टेजवर आला तेव्हा खेळाडूंनी शॅम्पेन फोडल्या. त्यावेळी शिखर धवनने शॅम्पेन फोडत रोहितच्या अंगावर जोरदार उडवली. त्यावेळी रोहित शर्मा शिखरवर चिडलेला पाहायला मिळाला. कारण कधीही चषक जिंकल्यावर पहिल्यांदा संघ फोटोसाठी स्टेजवर उभा राहतो आणि त्यानंतर शॅम्पेन फोडून विजयी संघातील खेळाडू सेलिब्रेशन करत असताता. पण या विजयाच्या नादात धवन ही गोष्ट विसरून गेला आणि त्यामुळेच रोहितची चीडचीड झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित चिडल्यावर शॅम्पेन उडवणं थांबवत सर्व जण फोटोसाठी पुढे सरसावले. रोहितने यावेळी संघाची परंपरा जपली आणि टीममधील सर्वात युवा खेळाडूच्या हाती चषक सोपवला. यावेळी रोहितने युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपच्या हातामध्ये चषक दिला आणि त्यानंतर भारतीय संघ फोटोसाठी उभे राहिले.
वाचा-
भारतीय संघाने चार विकेट्स लवकर गमावले होते. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हार्दिक पंड्याने चार विकेट्स आणि ७१ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर रिषभ पंतने धडाकेबाज नाबाद शतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकता आली.