मुंबई : मुख्यमंत्री यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांना आणखी एक धक्का देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, आढळराव पाटील, विजय नहाटा, यशवंत जाधव यासारख्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा :

शिवसेनेच्या १४ खासदारांसोबत नुकतीच एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर कदमांसह आनंदराव अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्र्यांवर नव्या कार्यकारिणीत नेते-उपनेतेपदाची खैरात करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी सर्वात मोठा धक्का ठाकरेंना दिल्याचं दिसतंय.

हेही वाचा :

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे गटाची पावलं पडत आहेत. शिवसेना संपविण्याचं कारस्थान महाराष्ट्राला कधीच मान्य होणार नाही. भाजपचा हा शिवसेना संपविण्याचा डाव आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here