मुंबई : मालिकांमध्ये अनेक उलथापालथी होत असतात. प्रेक्षकांनी रंजक वाटावं, असं कथानक वेगवान सुरू असतं. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतही अप्पू आणि शशांक यांच्यातला दुरावा काही केल्या कमी होत नाही. दोघांनी घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शशांकची सहकारीही तेल ओततेय.

अख्खं कानेटकर कुटुंब शशांक आणि अप्पू यांच्यातला दुरावा मिटवण्याचा सर्वोपरी प्रयत्न करत आहे. पण तरीही काही उपयोग होत नाही. म्हणूनच आता मालिकेत नव्या व्यक्तीची एन्ट्री होत आहे. ही आहे दमयंती दुधखळे. ती आहे विवाह सल्लागार. आणि ही भूमिका साकारतेय विशाखा सुभेदार.

जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी सांगायला येतोय अंकुश चौधरी, Video तुम्हाला आवडेल

विवाह सल्लागार असलेली दमयंती अप्पू आणि शशांकला एकत्र आणणार आहे. दोघांचं एकमेकांवर कसं प्रेम आहे, हे दाखवून देणार आहे. तेही विनोदी पद्धतीनं. कारण ही व्यक्तिरेखा विनोदी आहे. इथेही विशाखा काॅमेडी करून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.

विशाखा सुभेदार

ठिपक्यांची रांगोळी मालिकेमधील या भूमिकेविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाली, ‘मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन. जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे.’ दमयंती दुधखुळे नावावरूनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येतो. अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातला गुंताही सोडवते. त्यामुळे कथानकात बरीच वळणं येणार आहेत.

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील भूमिकेबद्दल काय म्हणाली पूजा पुरंदरे ?

मराठी मालिकांच्या टीआरपी आलेखात गेल्या अनेक महिन्यांपासून ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवलं आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच शशांक आणि अपूर्वा यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. शांत, समजूतदार शशांक आणि अवखळ बडबडी अपूर्वा यांची लव्हस्टोरी आणि आता त्यांच्या लग्नानंतरचे धमाल सीन यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकत्र कुटुंबात येणाऱ्या अडचणी, वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांमुळे होणारे वाद, गैरसमज, पण समस्या सोडवण्यासाठी सर्वांचं सहकार्य असे अनेक पैलू या मालिकेच्या कथानकात आहेत.

‘माझे आणि सिद्धार्थ जाधवचे रोल प्रेक्षकांनी मोजून दाखवावेत’, हेमांगी कवीचे चॅलेंज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here