पुणे : उगवत्या सूर्याला नमस्कार करत अनेक सेना पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. मातोश्री आणि ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत शिवाजीराव आढळराव पाटलांनीही २० दिवसांच्या संयमानंतर अखेर शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतलाय. आज शिंदे गटाने बोलाविलेल्या बैठकीला आढळरावांनी ऑनलाईन उपस्थिती लावून उद्धव ठाकरेंची साथ सोडली. राष्ट्रवादीतून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण पवारांनी खासदारकीचं तिकीट नाकारल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि थाटात तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकवला. आज मात्र उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावचे. त्यांच्या राजकीय सुरुवात राष्ट्रवादी पक्षातूनच झाली. भीमाशंकर साखर कारखाना उभारणीत आढळराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. ते भीमाशंकर साखर कारखान्याचे पहिले चेअरमन होते.

आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना ‘दे धक्का’, अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात सामील
पवारांनी तिकीट नाकारलं, ठाकरेंनी खासदार केलं

मात्र 2004 साली त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे लोकसभेचं तिकीट मागितले होते. त्यावेळी पवारांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 साली शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा संसदेत पाय ठेवला. शिवसेनेचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते पहिले खासदार झाले.

ठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले; आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची हकालपट्टी
आढळराव पाटील शिवसेककडून सलग तीन वेळा संसदेवर गेले. शिरुर लोकसभेचं १५ वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यांचे सामाजिक काम देखील मोठे असून त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था देखील आहे. तसेच बैलगाडा शर्यती सुरू करण्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे.

राणेंशी दंगा-काँग्रेस राष्ट्रवादीशी पंगा, भगव्यासाठी कायपण, भाईंनी सेना का सोडली? ५ मोठी कारणे
आढळरावांचा सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवास :

  • भीमाशंकर सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन व कारखाना उभारणीत मोलाचा वाटा.
  • सन २००४ साली राष्ट्रवादी पक्षामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश ; पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
  • सन २००४, सन २००९ व सन २०१४ साली शिवसेनेकडून खासदार
  • शिवाजीराव आढळराव पाटील सलग 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिले
  • शिवसेनेने त्यांना 2019 मध्ये शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली, मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला.
  • बैलगाडा शर्यती सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
  • सर्वसामान्य व गरजवंतांना शक्य ती सर्वोतोपरी मदत करणे,
  • धार्मिक स्थळे-तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्नशील राहणे,
  • क्रिकेट, बैलगाडा शर्यती आयोजन आणि पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणे,
  • शैक्षणिक कार्य, पर्यटन-प्रवास, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाठी मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here