प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ माजली. पोलिसांना मृतदेहांजवळ एक चिठ्ठी सापडली. आपण आपल्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यात आहे.

आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत. यात कोणाचाही दोष नाही. त्यामुळे कोणालाच काही बोलू नका आणि बदनामही करू नका. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि आम्हाला कोणी सोबत राहू देणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या इच्छेनं आत्महत्या करत आहोत, अशी चिठ्ठी लिहून दोघांनी जीवन संपवलं.
रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर मोकलपूर पोलीस ठाण्याचे एसआय जयकिशन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते सिवाना रुग्णालयात पाठवले. दोघांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network