Authored by Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 18, 2022, 10:10 PM

गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात माजी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हातात हात घालत जिल्ह्यावर राजकीय पकड निर्माण केली. दोघांनी कुठे कोरेंना, कुठे मंडलिकांना कुठे यड्रावकरांना तर कुठे अबिटकरांना सोबत घेत गोकुळ, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँकेवर झेंडा फडकवला. महाडिक गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना जवळ केले. त्यामध्ये ते यशस्वी झाले. यातून लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा सर्वच निवडणुकीत महाडिक गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

 

Satej patil And hasan Mushriff
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : गेल्या काही वर्षात सुसाट राजकीय प्रवास करत जिल्ह्यावरील पकड अतिशय मजबूत केलेले आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासमोर आता भाजप आणि शिंदे गटाचे कडवे आव्हान उभे राहणार आहे. नव्या राजकीय समीकरणात खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) , धैर्यशील माने (Dhairyashil Mane) , आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade), विनय कोरे (Vinay Kore) , राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar), प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar), राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) अशा अनेकांची मोठी फौजच एकत्र येणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात, पवारांनी तिकीट नाकारलं, झोकात सेना प्रवेश, थाटात खासदार
गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात माजी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हातात हात घालत जिल्ह्यावर राजकीय पकड निर्माण केली. दोघांनी कुठे कोरेंना, कुठे मंडलिकांना कुठे यड्रावकरांना तर कुठे अबिटकरांना सोबत घेत गोकुळ, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँकेवर झेंडा फडकवला. महाडिक गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना जवळ केले. त्यामध्ये ते यशस्वी झाले. यातून लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा सर्वच निवडणुकीत महाडिक गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना ‘दे धक्का’, अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात सामील
राज्यात अचानक भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणार आहे. भाजपला मिळालेली सत्ता, महाडिकांना राज्यसभेवर मिळालेली संधी आणि चंद्रकांत पाटील यांना मिळणारे मंत्रीपद यामुळे पहिल्या टप्प्यात या गटाला उभारी मिळाली होतीच. आता तर शिंदे गटामुळे भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे शिंदे गटात जाणार असल्याने आणि आमदार प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, यड्रावकर व आबिटकर हे या गटात गेल्याने भाजपचे कमळ आणखी फुलणार आहे.

ठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले; आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची हकालपट्टी
आत्तापर्यंत माजी मंत्री मुश्रीफ व पाटील यांची एकतर्फी घौडदौड सुरू होती. त्याला आता काही प्रमाणात ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. नव्या समीकरणामुळे गोकुळ, जिल्हा बँकेत सत्तांतर होणार नाही, पण विरोधकांची संख्या निश्चित वाढणार आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही माजी मंत्र्यांना नवीन गट कडवे आव्हान देणार आहे. मंत्रीपद नसल्याने त्यांच्यावर काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत. जिल्हा बँक आणि गोकुळमध्ये सोबत घेऊन फसविल्याचा राग आता मंडलिक आणि कोरे हे दोघेही काढण्याची चिन्हे अधिक आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासारखे अजून काही नेते शिंदे गटात सहभागी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे हा गट अधिक भक्कम होणार आहे. जो जेवढा भक्कम होईल, तेवढा त्रास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना होणार आहे.

राणेंशी दंगा-काँग्रेस राष्ट्रवादीशी पंगा, भगव्यासाठी कायपण, भाईंनी सेना का सोडली? ५ मोठी कारणे
नव्या समीकरणानुसार भाजपकडे तीन खासदार आणि तब्बल चार आमदार असणार आहेत. त्यामध्ये यड्रावकर, आबिटकर, आवाडे व कोरे यांचा समावेश असेल. काँग्रेसकडे पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव व राजूबाबा आवळे हे चार तर राष्ट्रवादीकडे मुश्रीफ व राजेश पाटील हे दोन आमदार असणार आहेत. भाजपच्या तुलनेत दोन्ही काँग्रेसकडे सध्या आमदारांची संख्या अधिक आहे. गोकुळ, जिल्हा बँक या महत्त्वाच्या आर्थिक सहकारी संस्था ताब्यात आहेत. या जोरावर मुश्रीफ व पाटील हे नव्या गटाला भिडण्यात कितपत यशस्वी होतात यावरच जिल्ह्याचे राजकारण अवलंबून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here