मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी लोहारा तालुक्यातील एका खेडेगावातील अंगणवाडीत शिकत असणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीला वर्गातुन चाॅकलेटच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणाने अंगणवाडीच्या बाहेर आणले आणि चाॅकलेट देऊन एका पडक्या वाडयात नेऊन या तरुणाने अत्याचार केला. सदरील घडलेला प्रकार पिडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगितला आणि ही घटना जिथे घडली तो पडका वाडा दाखवला.
अत्याचाराची घटना कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे आणि उपनिरिक्षक अनुसया माने यांनी घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन सर्व पाहणी केली. त्यानंतर पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.