cabinet portfolios Eknath Shinde camp | शिंदे गटाला केंद्रात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. याशिवाय, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे आज दिल्लीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

PM modi Eknath Shinde (1)
पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिंदे गटाला सरप्राईज दिले जाऊ शकते
  • शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
  • केंद्रात कोणत्या दोन खासदारांना मंत्रिपदं मिळणार?
मुंबई: आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांनीही जाहीरपणे बंडाचे निशाण फडकवल्यानंतर आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या सोमवारी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. हे सर्वजण मिळून लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे बंडखोर खासदार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिंदे गटाला सरप्राईज दिले जाऊ शकते. गेल्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सर्वांचेच अंदाज चुकवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले होते. त्यानंतर आता शिंदे गटाला केंद्र सरकारमध्ये दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Shivsena rebel MP’s in Loksabha mays get one cabinet and one minister of state post in Modi govt)

शिंदे गटाला केंद्रात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. याशिवाय, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे आज दिल्लीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बारा खासदारांच्या बंडखोरीवर गेल्या आठवड्यात शिक्कामोर्तब, राजकीय नाट्याची INSIDE STORY
तर दुसरीकडे आता विधिमंडळानंतर संसदेत शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदार वेगळा गट तयार करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेतील शिवसेनेच्या नव्या गटाचं नेतृत्त्व मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे देण्यात आले आहे. राहुल शेवाळे हे आज लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना तसे पत्र देतील. तर खासदार भावना गवळी यांना लोकसभेतील शिंदे गटाचे मुख्य प्रतोदपद देण्यात आले आहे.

आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही संरक्षण

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली होती. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या खासदारांनाही केंद्र सरकारकडून संरक्षण पुरवण्यात आले आहे. बंडखोर खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्याता आला आहे.
शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर फूट; संसदेतही स्वतंत्र गट स्थापन करणार, गटनेताही ठरला?
आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार: एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचल्यानंतर आणखी एक खळबळजनक दावा केला होता.शिवसेनेचे खासदार लवकरच आम्हाला भेटतील. आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार आहेत,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार आपल्यासोबत असल्याची तिरकस प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मात्र यातील सहा खासदार अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp may give 2 minister cabinet portfolios to eknath shinde camp shivsena mp’s
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here