सातारा :उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. विविध जिल्ह्यांत शिवसेनेला धक्के बसत असताना आता सातारा जिल्ह्यातही माजी जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे साताऱ्यातील माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

पुरुषोत्तम जाधव हे एकेकाळी सातारा लोकसभेचे शिवसेनेकडून उमेदवार राहिलेले आहेत. तसंच जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याच जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बंडखोर गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. जाधव हे आता सामाजिक कार्यात सक्रिय असून अनेक शिवसैनिक त्यांच्या थेट संपर्कात असतात. त्यामुळे जाधव यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात जिल्ह्यातील इतरही काही पदाधिकारी बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde Camp: एकनाथरावांना मुख्यमंत्रीपद दिलं, आता पंतप्रधान मोदी शिंदे गटाला आणखी एक सरप्राईज देणार?

राज्यात सत्ता असतानाही शिवसैनिकांची उपेक्षा झाली. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साताऱ्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, अशी भूमिका पुरुषोत्तम जाधव यांच्यासोबत शिंदे गटात दाखल होणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

GST Tax: ‘मोदींनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला अन् गोरगरीब जनतेच्या अन्नधान्यावर GST लादला’

दरम्यान, साताऱ्यातील पाटणचे शिवसेना आमदार आणि माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी याआधीच एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे साताऱ्यात पक्षसंघटन पुन्हा एकदा उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

101 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here