mulshi news today, मोठी बातमी! मुळशी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, ५०० मीटर जमीन दुभंगली – in mulshi taluka mild earthquake shocks five hundred meters of land split pune news
पुणे ( मुळशी) : मुळशी तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान होताना पहायला मिळत आहे. तसेच अनेक नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात येत आहे. त्याच मुळशी तालुक्याच्या धरण भागात मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी इथं सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याने तब्बल ५०० मीटर जमीन दुभंगली आहे.
मुळशी तालुक्यातील वाघवाडीत माळीणसारखी भूस्खलन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेत नागरिकांच्या स्थळांतराला प्राधान्य दिले जात आहे. नर्मदा बस दुघर्टनेनं दोन जीवांना केलं वेगळं; लग्न जुळलं, तारीख ठरली पण इंदोरहून घरी परततानाच… मुळशी धरण भागात असणाऱ्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या स्थितीमुळे १२ जुलैपासून साधारणतः पाचशे मीटर लांब भेग पडली आहे. ही भेग पडल्याने टाटा तलावाकडील जमिन एक ते दीड फुटापर्यंत पोहोचली आहे.
मुळशी तालुक्यात जमिन खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून हा भाग टाटा धरणाच्या हद्दीत येत असल्याने तात्पुरती मदत करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.