Pune Hadapsar Accident : पुणे शहरातील हडपसरमध्ये आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. गाडी घसरल्यानं टँकरच्या खाली आल्यानं वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला आहे.

हायलाइट्स:
- पुण्यातील हडपसरमध्ये अपघात
- हडपसर सासवड रोडवर अपघात
- दोघांचा मृत्यू
एकनाथरावांना मुख्यमंत्रीपद दिलं, आता पंतप्रधान मोदी शिंदे गटाला आणखी एक सरप्राईज देणार?
मीनाक्षी निखिल साळुंखे ( वय १० ), निखिल साळुंखे ( वय ३५ रा. ढमाळवाडी फुरसुंगी ) असे अपघातात मृत्यु झालेल्या वडील व मुलीचे नावं आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार, निखिल साळुंखे यांची मुलगी मीनाक्षी ही साधना शाळेमध्ये इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत होती. सकाळी सात वाजता शाळेला सोडायला वडील दुचाकीवरून जात असताना, सातववाडी येथे अपघात झाला.
एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र सुरुच, ठाकरे सरकारच्या काळातील ‘ते’ निर्णय रद्द, कार्यवाहीचे आदेश
कसा झाला अपघात?
सातववाडी येथे सायकल ट्रॅक शेजारी कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडी शेजारून पुढे जाणाऱ्या दुचाकी स्वराने दुचाकी चालू अवस्थेत हातातील कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत फेकली. त्यावेळी मागून येणारे निखिल साळुंखे गडबडले आणि चिखलावरून त्यांची दुचाकी घसरली, यामध्ये दोघेही बापलेकी पाठवून पाठीमागून येणाऱ्या टँकर खाली गेले, यामध्ये टँकरचे चाक वडिलांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेचा मृत्यू झाला.तर मुलीचे डोके रस्त्यावर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली होती, तिने वडिलांना पाहिले तेव्हा ती बाबा बाबा म्हणून ओरडली. तिला वाचवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ तिला रुग्णाला दाखल केले मात्र तो पर्यंत तिचाही रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणात हडपसर परिसरामध्ये पसरली. घटना स्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जात आहे घेतली.
शिवसेनेचं टेन्शन वाढलं, आमदार-खासदार फुटले अन् आता राज ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : pune accident news two wheeler accident two died in hadapsar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network