MNS cheif Raj Thackeray | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष कधी नव्हे इतका खिळखिळा झाला आहे. ही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेसाठी राजकीय सुवर्णसंधी ठरू शकते. आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी फुटल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद क्षीण झाली आहे. अशावेळी एका मोठा ब्रेक थ्रूच्या शोधात असलेला मनसे पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुसंडी मारू शकतो.

 

Raj Thackeray Uddhav Thackeray
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • मुंबईत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका
  • राज ठाकरे पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • बंडामुळे शिवसेना पक्ष कधी नव्हे इतका खिळखिळा झाला आहे
मुंबई: राज्यातील आमदारांपाठोपाठ शिवसेनच्या खासदारांनीही बंडाचे निशाण फडकावल्यामुळे उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत सापडले असतानाचा आता आणखी एक आव्हान त्यांच्यासमोर आ वासून उभे राहणार आहे. कारण, आता मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुन्हा सक्रिय होणार आहेत. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. मात्र, आता राज ठाकरे पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये येणार आहेत. राज ठाकरे हे आता मुंबईत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. ही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठीची तयारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या बैठकांमध्ये संबंधित क्षेत्रांमधील नगरसेवकपदाचे इच्छूक उमेदवारही सहभागी होणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. ( MNS starts preperation for BMC Election 2022)
Eknath Shinde Camp: एकनाथरावांना मुख्यमंत्रीपद दिलं, आता पंतप्रधान मोदी शिंदे गटाला आणखी एक सरप्राईज देणार?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष कधी नव्हे इतका खिळखिळा झाला आहे. ही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेसाठी राजकीय सुवर्णसंधी ठरू शकते. आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी फुटल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद क्षीण झाली आहे. अशावेळी एका मोठा ब्रेक थ्रूच्या शोधात असलेला मनसे पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुसंडी मारू शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बैठकांकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे.
एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र सुरुच, ठाकरे सरकारच्या काळातील ‘ते’ निर्णय रद्द, कार्यवाहीचे आदेश
गेल्याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये राज ठाकरे हे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे आता शिवसेना तिन्ही बाजूंनी घेरली गेली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील फुटीर गट, दुसरीकडे भाजपसारखा तगडा प्रतिस्पर्धी आणि तिसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्यासारख्या करिष्मा असलेला नेता अशा तिहेरी आव्हानाला शिवसेनेला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणखीनच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns cheif raj thackeray will take meetings for bmc election 2022 shiv sena uddhav thackeray challenges increases
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here