Ramdas Kadam cried in interview | बाळासाहेब ठाकरे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत, मला प्रचंड वाईट वाटत आहेत. पण ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. ५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता.

 

Ramdas Kadam (4)
रामदास कदम

हायलाइट्स:

  • ५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार करा
  • पण उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली
  • आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात
मुंबई: गेली ५२ वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना (Shivsena) आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिनाभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, अशा शब्दांत शिवसेनेतून हकालपट्टी झालेले बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते मंगळवारी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी रामदास कदम अक्षरश: ढसाढसा रडले.
Raj Thackeray: शिवसेनेचं टेन्शन वाढलं, आमदार-खासदार फुटले अन् आता राज ठाकरेही अ‍ॅक्शन मोडमध्ये
रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मी ५२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केले. राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचं भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल, असे वाटले नव्हते. गेल्या महिनाभराचा वेळ माझ्यासाठी फार वाईट होता. मला झोप लागत नाही, जेवण जात नाही. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आनंदी नाही, खुश नाही, समाधानी नाही. बाळासाहेब ठाकरे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत, मला प्रचंड वाईट वाटत आहेत. पण ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. ५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता. तुम्ही इकडे या, आपण बसून, बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, ही माझी अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरु नये, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.
Eknath Shinde Camp: एकनाथरावांना मुख्यमंत्रीपद दिलं, आता पंतप्रधान मोदी शिंदे गटाला आणखी एक सरप्राईज देणार?

ठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले; आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची हकालपट्टी

एकेकाळी ‘मातोश्री’चे निष्ठावंत असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी मागील आठवड्यात शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तर आज आजन्म पक्षाशी गद्दारी करणार नाही म्हणणाऱ्या रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर टीका करुन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांनी ठाकरेंशी घेतलेल्या पंग्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे यांनी दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena former leader ramdas kadam slams uddhav thackeray after joining eknath shinde camp ramdas kadam cried in interview
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here