Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सेना आमदार आणि खासदारांनी शिदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत.

 

NCP News
राष्ट्रवादी काँग्रेस

हायलाइट्स:

  • राज्यात पुन्हा पक्षांतराचं वारं
  • राजन पाटील भाजपच्या वाटेवर
  • राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा दुजोरा
सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं जोरदार यश मिळवल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना विरोधात बसण्याची वेळ आली. मात्र, अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आणि भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी आली होती. आता, सोलापूरच्या मोहोळमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसू शकतो.

मुंबईतील ‘या’ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध; फक्त इतके पैसे काढता येणार
राजन पाटलांचे राष्ट्रवादीला रामराम करण्याचे संकेत
मोहोळ तालुक्यातील स्थानिक राजकारणामुळं राजन पाटील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडून राजन पाटील यांना भेटीचा निरोप देण्यात आला होता. मात्र, ही भेट झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, राजन पाटील यांच्याकडून देखील आम्ही सत्तेसाठी हपापलेली माणसं नसून आमच्यासाठी स्वाभिमान महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी माहिती नसल्याचं म्हणत या विषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांनी सपासप केले ६ वार अन्…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून दुजोरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जाण्याची भूमिका असल्याची माहिती साठे यांनी दिली आहे. राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा समजली असून शरद पवार यांच्याकडून त्यांना भेटीसाठी बोलावण्यात आलं आहे. मात्र, आता विषय हाताबाहेर गेलेला असल्याचं साठे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना याबाबत माहिती कळवली असल्याचं साठेंनी म्हटलं.
नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्राने पाठीवर केले वार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra politics solapur ex mla rajan patil will be join bjp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here