नवी दिल्ली : कुटुंबीयांनी मुलीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याने आरोपी तरुण चिडला आणि त्याने मुलीचे लग्न मोडण्यासाठी तिच्या फोटोंशी छेडछाड करत अश्लील व्हिडिओ बनवला. इतकंच नाहीतर हा व्हिडिओ मुलीच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या कृत्यांचा पर्दाफाश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी अंकित बन्सल (२३, रा. तुघलकाबाद) याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केले आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार प्रकरणात आरोपी जामिनावर बाहेर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांनी सपासप केले ६ वार अन्…
पोलस उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजिराबाद भागात राहणाऱ्या २२ मुलीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. तिचे नुकतेच लग्न झाले आहे. काही अनोळखी व्यक्ती तिच्या फोटोंशी छेडछाड करत असून त्याने अश्लील व्हिडिओ बनवून तिचे पती, मित्र आणि सासरच्या मंडळींना इन्स्टाग्रामवर हे व्हिडिओ पाठवत आहे. फेक इंस्टाग्रामवर अकाउंट बनवून आरोपी सोशल मीडियावर सतत असे व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवत आहे.

या तक्रारीनंतर तातडीने गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. इन्स्टाग्राम आयडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा आयपी अॅड्रेस आणि मोबाइल नंबर ट्रेस करण्यासाठी पोलिसांना इन्स्टाग्राम मिळाले.

मोठी बातमी! मुळशी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, ५०० मीटर जमीन दुभंगली
आयपी अॅड्रेस ट्रेस करताच आरोपी अंकित बन्सलची ओळख पटली. पोलिसांनी गाझियाबाद, यूपी इथला रहिवासी अंकित बन्सल याला अटक केली. चौकशीत मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याचे निष्पन्न झाले. लग्नाची चर्चा सुरू होती आणि मुलगा-मुलगी बोलू लागले. त्यानंतर मुलीच्या लोकांना कळले की अंकितचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्यानंतर ते मागे हटले.

अंकितवर गोविंदपुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. यानंतर कुटुंबीयांनी मुलीचे इतरत्र लग्न लावून दिले. आरोपी तरुण अंकित बन्सल याला लग्न मोडणं सहन न झाल्याने त्याने मुलीचे लग्न मोडण्याचा कट रचला. त्याने बनावट इंस्टाग्राम, फेक आयडी तयार करून मुलीचे जुने फोटो वापरून ते अश्लील बनवले. यानंतर त्याने मुलीच्या पतीसह नातेवाईकांना पाठवण्यास सुरुवात केली. पण अखेर या नराधम आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात २०१९ चं वारं, राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here