लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचंही या महिलेने म्हटलं आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र, शेवाळे (Rahul Shewale) यांनी पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आपण विश्वास ठेवला, असेही या महिलेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
संबंधित महिलेने ट्विटरवर हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वीच या महिलेविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. एप्रिल महिन्यात या महिलेने खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. राहुल शेवाळे यांनी १२ मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात संबंधित महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राहुल शेवाळे शिवसेनेच्या बंडखोर गटाचे लोकसभेतील नवे गटनेते
दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा केल्यानंतर लोकसभेतील बंडखोर शिवसेना खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शिंदे गटाकडून मंगळवारी तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना देण्यात आले. राहुल शेवाळे हे या गटाचे नेते असतील. त्यांनीच हे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले.