Jayakwadi dam : मराठवाड्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी असून जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

 

Jayakwadi dam update
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार

हायलाइट्स:

  • मराठवाड्यासाठी मोठी बातमी
  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली
  • पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला
परभणी : राज्यात जुलै महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात देखील जोर लावला आहे. मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असलेल्या जायकवाडी धरणातील पाण्यासाठ्यात देखील वेगानं वाढ होतं आहे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी येथील नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे. तर सध्या स्थितीला धरणामध्ये ७३.९७ टक्के पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता केव्हाही धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्याने सध्या स्थितीला धरणामध्ये ३६ हजार ३०२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणाचे (आर एस ओ) परिचलन सूचनानुसार आवश्यक असणारी पाणी पातळी नियमित करावी लागणार आहे. पाण्याची अशी आवक धरणामध्ये सुरू राहिल्यास नजीकच्या काळामध्ये जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
‘जे आदित्य ठाकरे मला ‘काका-काका’ बोलायचे, ते माझंच खातं घेतील, असं वाटलं नव्हतं’
त्यामुळे परभणीसह मराठवाड्यातील जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांना जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन ही जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यास परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
अभिज्ञा भावे सांगतेय सुखी संसाराचा मंत्र, हा Video बघाच, हसू आवरणार नाही!
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक गावे गोदावरी काठावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.2006 ला आलेल्या महापुरामुळे या भागात खूप मोठे नुकसान झाले होते.आता जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढत असल्याने केव्हाही पाणी सुटेल परंतु असे असले तरी जायकवाडी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करावे अशी मागणी शाहागड, गोंदी परिसरातील नागरिक करत आहेत.
धक्कादायक; भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक, पुण्यात तक्रार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : marathwada weather update due to heavy rain in catchment area of jayakwadi dam water will released to godavari river
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here