मुंबई : अभिनेता संजय दत्त ची मुलगी त्रिशाला दत्त भलेही मनोरंजन आणि झगमगत्या दुनियेपासून दूर असली, तरीदेखील ती कायम चर्चेत असते. संजयची मुलगी त्रिशाला हिची गणना कायम स्टारकिड्समध्ये होते. त्रिशाला तिचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि ते खूपच व्हायरल होतात.

आईसाठी ६ हजारवेळा देवाच्या पाया पडायला तयार झालेला शाहरुख

सध्या संजयची ही लाडकी लेक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते तिच्यात झालेल्या बदलामुळे. त्रिशालानं तिचं वजन खूपच कमी केलं आहे. त्या संदर्भात तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिनं शरीराबद्दल सकारात्मक असे विचार मांडले आहेत. त्याबरोबर तिनं स्वतःचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिनं स्ट्रेच मार्क्स अभिमानानं दाखवले आहेत.

त्रिशाला दत्त

त्रिशालाची स्ट्रेच मार्क्स्सची पोस्ट आणि फोटो

Trishala Dutt ने तिच्या इन्स्टाग्रामवर एक प्रदीर्घ पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं की, ‘माझ्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स्स या गोष्टीचं प्रतिक आहे की माझं शरीर योग्य पद्धतीनं विकसीत होत आहे. माझ्या त्वचेला त्या वाढीला जुळवून घेणं शक्य होत नाहीये. त्यामुळे माझ्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स्स दिसत आहेत. मला आठवतं की माझ्या आयुष्यातील रिकामंपण भरून काढण्यासाठी मी खूप खायचे. रिकामपण भरून काढण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात शरीराचं नुकसान होत होतं, परंतु आता यातून मी बाहेर आल्याचा आनंद आहे.’

‘मी बायसेक्शुअल आहे’, स्टेजवर जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन

त्रिशाला दत्त

स्ट्रेच मार्क्स्स माझ्या लढाईचं प्रतिक

त्रिशालानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘हे योग्य नाहीये. मला हे स्ट्रेच मार्क्स नको होते परंतु आता ते आले आहेत आणि ते माझे आहेत. ते माझ्या लढ्याचं प्रतिक आहे. त्यांच्याकडे मी गर्वानं बघत आहे.’ त्रिशालानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिची सावत्र आई मान्यतानं हार्ट आणि फायर इमोजी शेअर केली आहे.

त्रिशाला दत्त

त्रिशाला दत्त फिजिओथेरेपिस्ट आहे आणि ती अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्रिशाला संजय आणि त्याची दिवंगत पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. रिचा शर्मा अभिनेत्री होती. ब्रेन ट्युमरमुळे तिचं १९९६ मध्ये निधन झालं. त्यानंतर त्रिशालाचं संगोपन तिच्या अमेरिकेतील आजी-आजोबांनी केलं. त्रिशाला अनेकदा सोशल मीडियावर तिच्या आईचे रिचा हिचे फोटो शेअर करत असते. संजय त्रिशालाच्या खूप जवळ आहे. काही वर्षांपूर्वी संजयनं मान्यताशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत.

त्रिशाला दत्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here