अभिनेत्रींच्या ड्रेसवरून त्या गरोदर आहेत का? अशा चर्चा आजकाल होताना दिसतात. एखादी अभिनेत्री ढगळे ड्रेस घालत असेल, तर ती प्रेग्नंट असावी, असाही अंदाज लावला जातो. तसंच काही तरी सोनालीच्या बाबतीही घडलं. तिनं नुकताच काळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला ड्रेस घातला होता. तिच्या या काळ्या ड्रेसवरचे फोटो व्हायरल झाले, अन् ती प्रेग्नंट तर नाही ना, अशा चर्चा रंगल्या.
अनुष्का शर्मा हिनं देखील ती गरोदर असल्याची बातमी असाच पोलका डॉटचा ड्रेस घालूनच दिली होती. त्यामुळं असा ट्रेंड आला आहे. पण आता या गरोदर असल्याच्या चर्चांवर अप्सरेनं मौन सोडलं आहे. सोनालीनं ती प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाली सोनाली?
‘ माझ्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा करणाऱ्यांना एकच गोष्ट सांगते की, मी प्रेग्नंट नाही. माझं एक मोठं स्वप्न ‘तमाशा लाईव्ह’ नुकतचं पूर्ण झालंय’, असं सोनाली म्हणतेय.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, यावर्षी सोनाली अनेक सिनेमातील भूमिकांमुळं चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पांडू सिनेमात सोनालीची भाऊ कदमसोबत जमलेली जोडी प्रेक्षकांना आवडली. पाँडीचेरी सिनेमातील सोनालीच्या भूमिकेनंही टाळ्या मिळवल्या. गेल्या वर्षी सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्याशी दुबईत साध्या पध्दतीने लग्नं केलं होतं. यावर्षी ७ मे रोजी तिनं पुन्हा एकदा लंडनमध्ये कुणालशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिचे मॅक्सिको येथील हनिमूनचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.