नवी दिल्ली: श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. आर्थिक अडचणींपाठोपाठ आता देशातील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नागरिकांना घर चालवणे अवघड होत आहे. जेवण आणि औषध टंचाईचा सामना करावा लागतोय. औषधांचा तुटवडा असल्याने डॉक्टरांनी नागरिकांना आजारी पडू नका, असे आवाहन केले आहे. अशातच श्रीलंकेतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसात वेश्या व्यवसाय वाढला आहे. पोट भरण्यासाठी अनेक महिलांवर वेश्या व्यवसाय होण्याची वेळ आली आहे. आयुर्वेद स्पा सेंटरच्या नावाखाली संपूर्ण देशात सेक्स वर्करचे काम सुरू आहे. एका रिपोर्टनुसार या व्यवसायात येणाऱ्या अधिकतर महिला कापड उद्यागोतील आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत कापड उद्योगात काम होते. त्यानंतर देशाची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि महिलांना वेश्या व्यवसायात यावे लागले.

वाचा-

श्रीलंकेतील द मॉर्निंग या वृत्तपत्रानुसार, कापड उद्योगात काम करणाऱ्या महिलांना नोकरी गमवण्याची भिती आहे. खराब अर्थव्यवस्थेमुळे अन्य पर्यायी रोजगार उपलब्ध नसल्याने महिला मोठ्या प्रमाणात महिला वेश्या व्यवसायात येत आहेत. कापड व्यवसाय क्षेत्रातील परिस्थिती गंभीर आहे. एका सेक्स वर्कने वृत्तपत्राला सांगितले की, आम्ही ऐकले की देशातील आर्थिक संकटामुळे नोकरी गमवावी लागू शकते. सध्या जो पर्याय सर्वात चांगला वाटतो तो म्हणजे सेक्स वर्क होय.

आधी आम्हाला महिन्याला २८ हजार रुपये मिळायचे. ओव्हरटाइम केले तर ३५ हजार मिळायचे. आता सेक्स वर्कमध्ये प्रत्येक दिवशी १५ हजार रुपयांपेक्षा अधिक मिळतात. प्रत्येकाला ही गोष्ट पटणार नाही पण सत्य हेच आहे, असे संबंधित महिलेने सांगितले. युकेच्या ‘द टेलिग्राफ’ने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जानेवारीपासून कोलंबोमधील सेक्स वर्कमध्ये येणाऱ्या महिलांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे.

वाचा-

रिपोर्टनुसार या महिला कोलंबोच्या अंतर्गत भागातील आहेत. ज्या आधी कापड उद्योगात काम करत होत्या. SUMLने दिलेल्या माहितीनुसार या महिला घरातील मुलं, आई-वडिल, आणि भाऊ-बहिणींचा भार उचलतात. श्रीलंकेत असे फार कमी व्यवसाय शिल्लक राहिले आहेत जे कमी वेळेत अधिक पैसे मिळवून देतात.

वेश्या व्यवसाय वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेली माहागाई होय. देशात इंधन, अन्न धान्य आणि औषधांची कमतरता आहे. यामुळे महिलांना अधिक निराश केलय. काही रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटले आहे की, अन्न धान्य आणि औषधे अशा गरजेच्या वस्तूंसाठी महिलांना स्थानीक दुकानदारांसोबत सेक्स करावा लागतोय.

वाचा-

कोलंबो येथील भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलाय. या शिवाय वेश्या व्यवसाय चालवणारे मालक महिलांना पोलिसांसोबत सेक्स करण्यास भाग पाडतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या महिलांवर सक्तीने असुरक्षित संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे. काही महिलांना ग्राहकांकडून मारहाण देखील केली जाते, असे रिपोर्ट्समध्ये म्हटलय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here