भारातमध्ये आयपीएलमध्ये म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात त्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये आठ संघ होते. पण यावेळी आयपीएलमध्ये अजून दोन संघांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळवले गेले होते. पण ही मिनी आयपीएल कधी होणार आहे, जाणून घ्या…

हायलाइट्स:
- मिनी आयपीएलमध्ये ९ संघांचा समावेश असेल.
- या ९ संघांमध्ये मुंबई इंडियन्सला संधी मिळणार आहे.
- पण ही आयपीएल भारताबाहेर ठेवण्यात येणार आहे..
मिनी आयपीएल ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ आयोजित करणार आहे आणि स्पर्धेत ९ संघ असतील. पण या ९ मधील सहा संघ हे आयपीएलमधील असतील, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण या लीगसाठी संघांनी अर्ज करायची तारीख ही १३ जुलै होती आणि यामध्ये आता आयपीएलमधील सहा संघांनी अर्ज केल्याचे समोर आहे आहे. त्यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाच्या मालकांनी अर्ज केला आहे. या संघांना मिनी आयपीएलमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुंंबई इंडियन्सचा संघ यामध्ये केप टाऊनमध्ये सराव करण्यासाठी उत्सुक आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा जोहान्सबर्गमध्ये आपल्या खेळाडूंसाठी सराव प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
भारातमध्ये आयपीएलमध्ये म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात त्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये आठ संघ होते. पण यावेळी आयपीएलमध्ये अजून दोन संघांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळवले गेले होते. यावर्षी गुजरात टायटन्स हा नवीन संघ आयपीएलमध्ये उतरला होता. गुजरातचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाने यावर्षी आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. त्यामुळे आता या मिनी आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण त्यापूर्वी आयपीएलमधील हे सहा संघ कोणत्या खेळाडूंना खेळवणार आहेत, हे सर्वात महत्वाचे असणार आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network