नंदुरबार : आई सोबत गुरे, शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळोदा तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील सरदार नगर पुनर्वसन येथील तीन वर्षीय हा चिमुकला त्याच्या आईसोबत गुरे, बकऱ्या आणि शेळ्या चारण्यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी तळोदा तालुक्याच्या सरदार नगर पुनर्वसन जवळ असलेल्या जंगलात गेले होते. यावेळी अचानक एका बिबट्याने शेळ्यांवर आणि तीन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Rupali Patil: ‘लगेच शरद पवारांवर खापर फोडलं, बाबांनो…’ रामदास कदमांवर रुपाली पाटील भडकल्या
मुलाच्या आईने आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आई ने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात लेकराचा जीव गेला. ही घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून वनविभागासह प्रशासनातील अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनविभागाचे अधिकारीसह कर्मचारी प्रशासनातील अधिकारी आमदार राजेश पाडवी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चिमुकल्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. तळोदा तालुक्यातील सरदार नगर पुनर्वसन परिसरात या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.

पवारांना सोडून चालणार नाही, आढळरावांनी सांगितला १५ दिवसांपूर्वीचा उद्धव ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here