| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 19, 2022, 5:10 PM

Kesariya Song Dance Video रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. रणबीर- आलियाच्या लग्नावेळी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. अगदी काहीच वेळात गाण्याचं टीझर व्हायरल झालं होतं. १७ जुलै रोजी ‘केसरिया’ गाणं रिलीज झालं आणि काही वेळासाठी ट्रेंडमध्येही आलं.

 

kesariya song
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतच या चित्रपटातील ‘केसरियाँ’ हे गाणं देखील लॉंन्च करण्यात आलंय. प्रेक्षक ‘केसरियाँ’च्या प्रतीक्षेत होते. या गाण्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहणं हिच प्रेक्षकांसाठी मेजवानी होती.

यापूर्वी ‘केसरियाँ’ गाण्याच्या ४५ सेकंदाच्या टीझरनं इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली होती. अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल्स बनवत गाण्याचं कौतुक केलं होतं. याच गाण्यावर थिरकणाऱ्या एका मराठमोळ्या मुलीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर इतका व्हायरल झाला की तो थेट आलिया भट्टने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.

शिवानी गावडे असे या मराठमोळ्या मुलीचे नाव असून, ती भर पावसात…उधाणलेल्या समुद्रासमोर ‘केसरिया’ गाण्यावर मनमुराद थिरकताना दिसत आहे. आलियाने हा व्हिडिओ तिच्या स्टोरीवर शेअर केल्यानंतर या व्हिडिओला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


‘केसरिया’ या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले असून अरिजित सिंगनं गायलं आहे. संपूर्ण गाणे ईशा आणि शिव यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याची एक ओळ आहे की- ‘काजल की स्याही से लिखी हैं तूने न जाने कितनों की लव स्टोरियां’.तर यामध्ये ‘लव्ह स्टोरिया’ ऐवजी केसरियाशी यमक जुळणारे अनेक शब्द वापरता येतील असे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : marathi dancer girl shivani gawde kesariya song dance video share by alia bhatt
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here