ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचे दिसून येत आहेत. महापालिका तर्फे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक रस्त्यांवर खड्डे अजूनही आहेत. यातच महापालिकेचा एक बॅनर सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. हा बॅनर नक्की महापालिकेने लावला की इतर कोणी लावला हे समजलेले नाही. तर याबाबत केडीएमसी अधिकाऱ्यांना विचारले असता हे बॅनर कुठे आणि कोणी लावले आहेत ह्याची माहिती घेऊन सांगू असे सांगण्यात आलं आहे.

पावसाला सुरुवात होत नाही तोच कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. दरवर्षी खड्ड्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपये ओतल्यानंतरही नागरिकांची खड्ड्यांतून काही सुटका झालेली नाही. कल्याण मध्ये खड्ड्यात पडून दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे खडी टाकून बुजवण्यास सुरुवात केली आहे. परंतू पावसाची संततधार सुरु असून खड्ड्यांतील ही खडी किती तग धरणार याविषयी शंका आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची खराब अवस्था होऊनही पालिका त्यावर ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खड्ड्यांचा निधी लाटण्यासाठी प्रशासन रस्त्यांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत.

माझ्या भात्यातील कितीही ‘बाण’ घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, ठाकरेंनी ठणकावलं
यातच आता महापालिकेचा एक बॅनर सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. हा बॅनर नक्की महापालिकेने लावला की इतर कोणी लावला हे समजलेले नाही. तर याबाबत केडीएमसी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे बॅनर कुठे आणि कोणी लावले आहेत ह्याची माहिती घेऊन सांगू असे सांगण्यात आलं आहे. या बॅनरवर वाहनचालकांनी वाहने हळू आणि काळजीपूर्वक चालवावी अशी विनंती करण्यात आली आहे.

काय लिहीलं आहे बॅनरवर…

‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सावधान संततधार अतिवृष्टीने रस्त्यांवर खड्डे झालेले आहेत. खड्डे भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वाहन चालकांनी (विशेषत: दुचाकी) वाहने हळू व काळजीपूर्वक चालवावी ही नम्र विनंती’, आदेशावरुन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांचा आंदोलनाचा इशारा

२७ गावात अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या कामासाठी हा भोपरचा अर्धा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. गेल्या महिन्यात कंत्राटदाराने या रस्त्याचे डांबरीकरण केले. परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. भोपर कमान ते शनी मंदिरपर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हा रस्ता उतारावर असल्याने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असते. गतीरोधकांमुळे पावसाचे पाणी साचत असून हे पावसाचे पाणी जाण्यासाठी चक्क गतीरोधकच खोदून पावसाच्या पाण्यास वाट काढून देण्यात आली आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला चिखल साचलेला आहे. तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर १५ दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार. असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आला आहे.

गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना दणका, शिंदे गटातील ३ नगरसेवक फोडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here