Beed Crime News : बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर भागात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झाल्याने खंडेश्वरी परिसरात खळबळ उडाली. दुपारच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे.

 

bead crime news youth crushed to death by stone in beed khandeshwari temple area (1)
भरदिवसा युवकाची दगडाने ठेचून हत्या, बीडमधील धक्कादायक घटना

हायलाइट्स:

  • दगडाने ठेचून तरूणाची हत्या
  • हत्येमुळे परिसरात एकच खळबळ
  • बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
बीड : बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर भागात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झाल्याने खंडेश्वरी परिसरात खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बीड शहरात खंडेश्वरी मंदिर परिसरात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर खंडेश्वरी परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला माहिती देताच पोलीस प्रशासन त्याठिकाणी दाखल होऊन पंचनामा करत त्या युवकाला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र, या युवकाचे नाव अद्याप कळू शकलेलं नसून हा खून का झाला आहे याचं कारणही अद्याप समजू शकलं नाहीये.

उद्धव ठाकरेंसोबत पॅचअप करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं थेट अन् स्पष्ट उत्तर
या हत्येनंतर बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात जवळपास हत्येचे सत्र सुरू असून पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. बीड जिल्ह्यात सतत गुन्हेगारी वाढत असल्याने इथलं भय कधी संपेल? हाच प्रश्न आता नागरिक प्रशासनाला विचारताना दिसत आहेत.

स्वतंत्र गटाच्या स्थापनेसाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र, एकनाथ शिंदेंचं दिल्ली दौऱ्यात मोठं पाऊल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bead crime news youth crushed to death by stone in beed khandeshwari temple area
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here