Raosaheb Danve | शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केली आहे. युतीचा फॉर्म्युला तेव्हाच ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मु्ख्यमंत्री, हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युलात काहीही मोडतोड करायची नाही, असे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला

 

Amit Shah Uddhav Thackeray (1)
उद्धव ठाकरे आणि अमित शहा

हायलाइट्स:

  • आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांचा मला फोन आला
  • आम्ही ही चर्चा करण्यासाठी एक टीम तयार केली
  • सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मातोश्रीवर घडलेल्या प्रसंगाबद्दल नवा खुलासा केला आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळला नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणतात. पण तेव्हा मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांचा मला फोन आला. आपल्याला शिवसेनेसोबत (Shivsena) युतीची चर्चा करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर आम्ही ही चर्चा करण्यासाठी एक टीम तयार केली. या टीममध्ये मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांचा समावेश होता. अमित शहा मुंबईत आले त्यावेळी आम्ही शिवसेनेशी काय बोलायचे, याबाबत चर्चा केली. सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो. तिथे शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. काहीवेळ आमच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धवजी अमितभाईंना म्हणाले की, ‘अपून दोनो जरा अंदर बैठेंगे’. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा आतल्या खोलीत गेले, आम्ही बाहेरच बसून होतो, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
भाजपश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत १२ तास वाट पाहावी लागली?
काहीवेळानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा बाहेर आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच पत्रकारपरिषद घेऊ या, असे म्हटले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा काही विषयच काढला नाही. त्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे पत्रकारपरिषद घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आतल्या खोलीत काय चर्चा झाली, हे आम्हाला सांगितले नाही. पण सह्याद्री अतिथीगृहावर गेल्यानंतर अमित शहा यांनी मला सगळे काही सांगितले. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या जागावाटपाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा विषय काढला होता. पण मी त्यांना सांगितलं की, शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केली आहे. युतीचा फॉर्म्युला तेव्हाच ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मु्ख्यमंत्री, हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युलात काहीही मोडतोड करायची नाही, असे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.
Sanjay Raut: संजय पांडेंना अटक, राऊतांनाही ‘ईडी’ची नोटीस; मोहित कंबोज म्हणाले, Mission Complete
केव्हातरी स्फोट होणारच होता: दानवे

शिवसेना आणि भाजपची युती २५ वर्षे टिकली. ही युती हिंदुत्त्वाच्या समान विचारावर आधारित होती. आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या. त्यावेळी लोकांनी युतीला कौल दिला होता. पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी दगाफटका केला. जनतेला आणि शिवसेनेच्या आमदार-खासदारांना ही गोष्ट पसंत पडली नव्हती. त्यामुळे केव्हातरी स्फोट होणारच होता, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या कृतीला पाठिंबाही दिला. एकनाथ शिंदे गटाच्या बंडाशी भाजपचा काहीही संबंध नाही. मुळात एकनाथ शिंदे गट आम्ही बंड नव्हे तर उठाव केला, असे सांगत आहेत. शिंदे गटाकडे जास्त आमदार आणि खासदार असल्यामुळे त्यांचा दावा अधिक प्रबळ आहे, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp union minister raosaheb danve on uddhav thackeray and amit shah on matoshree
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here