मुंबई- अलीकडेच खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ती गरोदर असल्याचं बोललं जात होतं. ही बातमी एवढी व्हायरल झाली की करिनाने यावर स्पष्टीकरण देतं या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. देशाच्या लोकसंख्येमध्ये सैफचं मोठं योगदान असल्याचंही करिना यावेळी म्हणाली.

करिनाचा नुकताच एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ती सैफ अली खानसोबत वाइन पिताना आणि पास्ता खाताना दिसली होती. हा फोटो त्यांच्या लंडनच्या सुट्टीतील होता. यामध्ये करिनाचं पोट वाढलेलं दिसत होतं, नेमकी याचमुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू झाली होती. काही लोकांनी हा फोटोशॉप केलेला फोटो असल्याचं सांगितलं होतं, तर काहींनी ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं मत मांडलं होतं.

आता करिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या फोटो मागची सत्यता सांगत ती प्रेग्नंट नसल्याचंही स्पष्ट केलं. करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘हा वाईन आणि पास्ताचा प्रभाव आहे. त्यामुळे धीर धरा. मी गरोदर नाही. सैफ म्हणतो की त्याने आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये आधीच खूप योगदान दिले आहे.’

करिनाने २०१२ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. करीना आज सैफसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. करीना आणि सैफ हे दोन मुलांचे पालक आहेत, ज्यांची नावं तैमूर आणि जेह आहेत. तिच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर करिना लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here