Eknath Shinde Letter To Election Commmission of India : एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात एकनाथ शिंदे गटाने आपल्यालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ‘शिवसेना कोणाची?’ या प्रश्नावरून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात असणारी लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचली आहे.

हायलाइट्स:
- खरी शिवसेना आमचीच,
- आम्हाला मान्यता द्या,
- एकनाथ शिंदेंच्या सहीने निवडणूक आयोगाला पत्र
शिवसेनेच्या १२ खासदारांनी बंड केल्यानंतर लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन केला होता. या स्वतंत्र गटाच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी मंगळवारी रात्री उशीरा या गटाला मान्यताही दिली होती.
सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी दिल्लीतील घडामोडींना वेग
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने आपापली कायदेशीर बाजू योग्य असल्याचा दावा केला आहे. मात्र, आता न्यायालय यावर काय निकाल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र, न्यायालयाने वेगळा निकाल दिल्यास शिवसेनेसमोर अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना पात्र ठरवल्यास एकनाथ शिंदे गटाला विधिमंडळात अधिकृतरित्या मान्यता मिळेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network