मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा सध्या चर्चेत आहे. न्यासा मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी करत असतानाचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. त्याला चाहत्यांची पसंतीही मिळते. आताही पबच्या आत ती आपल्या फ्रेंड्सबरोबर धमाल आणि डान्स करत असतानाचे फोटो समोर आले आहेत.

मित्रमैत्रिणींबरोबर ग्रीसमध्ये न्यासाची सुरू आहे पार्टी
Nysa Devgan गेले काही दिवस आपल्या फ्रेंड्ससोबत युरोप टुरवर आहे. न्यासा आता ग्रीसला पोहोचली. तिथले पार्टीचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. न्यासाचा फ्रेंड Orhan Awatramani यानं Mykonos मध्ये न्यासा आणि इतर मित्रांचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहोत.

अप्सरेला कसली वाटते भीती? सोनालीला या गोष्टीचा आहे फोबिया

वेदांत महाजनसोबत दिसली न्यासा
या फोटोंमध्ये ती आपल्या बेस्ट फ्रेंड्सबरोबर पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत ती वेदांत महाजनबरोबर रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

न्यासा फ्रेंड्सबरोबर करतेय धमाल डान्स
न्यासा आणि तिच्या मित्रमैत्रिणींमधले बंधही चांगलेच जाणवतात. पार्टी हाॅलच्या आतले फोटोही समोर आले आहेत. त्यात न्यासा आणि मित्रमैत्रिणी नाचताना दिसतायत. न्यासा गाण्यावर लिप सिंकही करताना दिसत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला न्यासा अॅमस्टर्ड डॅमला पोहोचली. तिथे तिला जान्हवी कपूर, वरुण धवन आणि नताशा दलाल भेटले. त्याचे फोटो जान्हवीनं शेअर केले होते. न्यासानं अॅमस्टर्ड डॅमला खूप मजा केली. त्याआधी ती लंडनला गेली होती. तिथेही त्यांची मित्रमैत्रिणींची मैफल रंगली होती.

न्यासाची पार्टी

न्यासा देवगण स्वित्झर्लंड इथल्या Glion Institute of Higher Education मध्ये शिकत आहे. अजय देवगण आणि काजोलचं लग्न १९९९ रोजी झालं आणि २००३ मध्ये न्यासाचा जन्म झाला. न्यासा बाॅलिवूडमध्ये येणार, सिनेमे करणार अशा बातम्या आहेत. पण अधिकृतपणे कळलं नाहीय.

अमिषा विरोधात वॉरंट जारी, ११ लाख घेऊन कार्यक्रमाला गेलीच नाही

आधी आईच्या मैत्रिणीशी लग्न, आता सुष्मिता सेन; ललित मोदी विजय मल्ल्यावरही भारी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here