मुंबई- अटक केलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघलसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो ट्विटरवर शेअर केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मंगळवारी चित्रपट दिग्दर्शक यांना मुंबईतून ताब्यात घेतले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अविनाश दास यांना पुढील कारवाईसाठी अहमदाबाद येथे आणण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अहमदाबाद शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डीपी चुडासामा म्हणाले, ‘आम्ही दासला मंगळवारी मुंबईतून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आमची टीम त्याला अहमदाबादला आणत आहे.’

दोन प्रकरणात गुन्हा दाखल
अहमदाबाद क्राइम ब्रान्चने भारतीय दंड संहितेच्या कलम ४६९ (बनावट) तसेच राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार दास यांच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे. त्याने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर राष्ट्रध्वज परिधान केलेल्या महिलेचा आणखी एक फोटो पोस्ट केला होता.

अविनाश दास यांच्याविरुद्ध जूनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता

पूजा सिंघलने शाहच्या कानात काहीतरी बोलत असल्याचा फोटो शेअर केल्यानंतर ४६ वर्षीय अविनाश दासविरुद्ध जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पूजा सिंघलला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

गुन्हे शाखेने केला आरोप
एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, दास यांनी हा फोटो शेअर करताना सिंघल यांना अटक होण्याच्या काही दिवस आधीचे असे लिहिले होते, तर हा फोटो २०१७ मध्ये घेण्यात आला होता. अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप गुन्हे शाखेने केला आहे.

ध्वज घातलेल्या महिलेचा फोटोही शेअर केला होता
याशिवाय देशाचा ध्वज घातलेल्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्राभिमानाचा अपमान केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

सत्र न्यायालय, गुजरात आणि मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली
सेशन्स कोर्टाने दासची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली. या मागचं कारण देत न्यायालय म्हणालं होतं की, त्याने जाणवपूर्वक IAS अधिकाऱ्याच्या अटकेपूर्वीचा फोटो पोस्ट करून शाह यांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने हे केले होते. याशिवाय गुजरात उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

SHE वेब सीरिजही बनवली

अविनाश दास यांनी २०१७ मध्ये ‘अनारकली ऑफ अरह’ हा चित्रपट केला होता ज्यामध्ये स्वरा भास्कर, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा सारखे कलाकार होते. याशिवाय त्याने २०२१ मध्ये रिलीज झालेला ‘रात बाकी है’ हा चित्रपट केला होता. त्याने OTT वर SHE ही लोकप्रिय वेब सीरिजदेखील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here