भारतीयांनी मायदेश सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. त्यावर वैयक्तिक कारणांमुळे या नागरिकांनी मायदेश सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. भारत सोडून अन्य देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलं आहे. भारत सोडून जाणाऱ्यांची सर्वाधिक पसंती अमेरिकेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. या यादीत कॅनडा तिसऱ्या, तर ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे.
Home Maharashtra pakistan, वर्षभरात किती भारतीय पाकिस्तानात स्थायिक झाले? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच चकित...
pakistan, वर्षभरात किती भारतीय पाकिस्तानात स्थायिक झाले? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच चकित – over 163,000 renounced indian citizenship in 2021 us top choice
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०२१ मध्ये किती भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आणि ते अन्य देशात स्थायिक झाले, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आलं. सरकारनं दिलेली आकडेवारी पाहून सारेच चकित झाले. २०२१ मध्ये १ लाख ६३ हजार ३७० जणांनी नागरिकत्व सोडल्याची आकडेवारी केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी दिली.