मुंबई: अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. अशा परिस्थितीत एकमेकांची मदत करण यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण मुक्या जनावरांना मात्र ते शक्य होईलच असं नाही. अशा परिस्थिती जनावरांना सोडून अनेकजण सुखरूप बाहेर येतात. पण माणुसकीला लाजवेल असं काही तरी चंद्रपूरातील बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावात घडलंय. या घटनेवर अनेकांना सोशल मीडियावर संतापही व्यक्त केलाय. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनं देखील हा घडलेला प्रकार घृणास्पद असल्याचं म्हटलं.

काय घडलंय नेमकं?
चंद्रपूरातील बल्लारपूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. दहेली नावाच्या गावामध्ये तरुणांनी एका पाळीव श्वानाला ठार केलं आहे. तीन ते चार तरुणांनी श्वानाच्या पायाला दगड बांधला , इतकंच नाही तर मानेला फास आवळून त्याला नदीच्या फेकून दिलं.

जनावर असलं तरी त्यालाही जीव आहे. तो श्वान जिवाच्या आकांतानं किंचाळत होता. नदीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होता. पाळीव असल्यानं जीव वाचेल या आशेनं तो पुन्हा त्या तरुणांकडं आला. मात्र निर्दयी तरुणांनी त्या श्वानाच्या तोंडाला तारा बांधल्या आणि त्याला पुन्हा नदीत फेकलं. ती मुलं इथवरच थांबली नाहीत, तर याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. या तरुणांविरोधात कारवाई करण्यात यावी , अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान,अभिज्ञाचं प्राणीप्रेम सर्वांनाच माहीत आहे. भटक्या मांजरी आणि कुत्र्यांची ती नेहमीच काळजी घेत असते. अभिज्ञाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचं हे प्रेम पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आलं होतं. वाढदिवसानिमित्त तिनं प्राण्यांची काळजी घेणाऱ्या एका सामाजिक संस्थेला भेट दिली होती. तिनं त्या संस्थेला फक्त भेटच दिली नाही तर त्यांना मदतही केली. त्या संस्थेत भटके, जखमी किंवा स्वतःहूनच तिथपर्यंत पोहोचलेले कुत्रे, मांजरीसह विविध प्राण्यांची आणि पक्ष्यांची काळजी खूप छान घेतली जाते.

abhidnya bhave strory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here