threat to former mp shivajirao adharao patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन धमकी दिली. त्यांना शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेच्या एकूण १७ कार्यकर्त्यांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

a case has been registered against 17 people who threatened former mp shivajirao adharao patil
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी

हायलाइट्स:

  • माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धमकी.
  • शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन दिली धमकी.
  • १७ जणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल.
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच काही कार्यकर्त्यानी त्यांना घरी जाऊन शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी खेड पोलिसात १७ जणांहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against 17 people who threatened former MP Shivajirao Adharao Patil)

गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे,गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिंदे गटाला १० दिवसांचा वेळ वाढवून देणं बेकायदेशीर?, काय म्हणाले कायदेतज्ज्ञ असीम सरोदे वाचा

खेड येथील पुणे नाशिक महामार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारले होते. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून लोकांना अडवून ठेवले, त्यानंतर निषेध व्यक्त करत कार्यकर्ते हे आढळराव यांच्या घरी जात त्यांना हात पाय तोडू अशी धमकी दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहे.

क्लिक करा आणि वाचा- आढळराव पाटलांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसैनिकांचं आक्रमक आंदोलन
क्लिक करा आणि वाचा- ‘काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक संपर्कात, पुढील आठवड्यात मोठा गौप्यस्फोट करणार’

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : a case has been registered against 17 people who threatened former mp shivajirao adharao patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here