यवतमाळ : जिल्ह्यात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. वणी, राळेगाव, मारेगाव तालुक्यात नदी नाल्या काठांवरील आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे घर जमीनदोस्त झाली आहेत.

राळेगाव तालुक्यातील रावेरी आणि हेटी भागात रामगंगा नदीच्या पूरात सार वाहून गेलं आहे, असं येथील गावकरी सांगत आहेत. घरातील भिंती वाहून गेल्या, धान्य वाहून गेलं जिथं स्वयंपाक घर होतं तिथं पाण्यात गहू भिजला आहे. त्यालाही कोंब फुटले आहे बराच प्रमाणात गहू आणि तांदूळ वाहून गेला आहे. आता काहीही शिल्लक राहिलं नाही, असं कविता पचारे या नुकसानग्रस्त महिलेने सांगितलं आहे.

‘तुमचे हातपाय तोडू’; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना घरी जाऊन दिली धमकी
घरातील सर्व वस्तू कपडे, अन्नधान्य आणि शेतीसाठी लागणारे खतसुद्धा पुरात वाहून गेले आहे. आता पुरात वाहून गेलेल्या वस्तू कुठे सापडतात का याची शोधाशोध केली जात आहे. तर कुठे भुईसपाट झालेल्या घराचे साहित्य गोळा करण्याचे काम केलं जात आहे. पुरात अन्नधान्य गेले, अंगावर आहे तेवढेच कपडे शिल्लक आहे, बटाई ने केलेल्या शेतीत सुध्दा पीक राहीलं नाही, जमीन खरडून गेली, अशी विदारक अवस्था यवतमाळातील नागरिकांची पूराने केली आहे.

तर तेथील स्थानिक रहिवासी विनोद शेंडे यांच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही कुटुंबात पाच जण आहोत. पूर दारात आला आणि लहान मुलांच्या छातीपर्यंत घरात पाणी आलं आणि आम्ही सर्व बाहेर पडलो. पुरात बाजासकट सार वाहून गेलं आता काहीच शिल्लक नाही, असं शेंडे कुटुंबियानी सांगितलं आता शासनाने तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा पूरबाधित गावकऱ्यांची आहे.

Atari Encounter- अटारी एन्काउंटर संपलं, सिद्धू मूसेवाला हत्याकांडातले चारही शूटर ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here