सोलापूर : कंटेनर व स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन कर्मचारी जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावाच्या हद्दीत बिल्ट कंपनीच्या मटेरियल गेट समोर आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. उमेश श्रीकृष्ण वैद्य (वय ४७, रा. अदित्यनगर विजापुर रोड सोलापुर) असे अपघातात मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजकुमार श्रीपती वाघमारे( वय ६२) व स्विफ्ट चालक प्रफुल्ल रमेश शिरसागर हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असा झाला अपघात

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणेकडून सोलापूरकडे कंटेनर क्र.एमएच ०४ जेके ४४०५ हा भरधाव वेगाने जात होता. भादलवाडी येथे आल्यानंतर तो कंटेनर दुभाजकामधून बिल्ट कंपनीकडे जात असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कार क्र.एमएच १३ बीक्यू ००९७ ची त्यास जोरदार धडक बसली. यामध्ये डोक्यास जबर मार लागल्याने स्विफ्ट कार मधील उमेश वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. मृत वैद्य हे सोलापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. अपघातग्रस्त कंटेनर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्ता द्या-OBC आरक्षण घ्या, नाही दिलं तर राजकारण सोडतो, फडणवीसांनी घोषणा खरी करुन दाखवली!
हायवे झाल्याने अपघात वाढले

पुणे सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरणामुळे वाहनांना खूप वेग प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशा अपघातांची भर पडत आहे. सदर अपघाताचे वृत्त समजताच भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार केशव वारघड करीत आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्मशान शांतता

कार्यालयाच्या सरकारी कामासाठी अव्वल कारकून उमेश वैद्य व इतर कर्मचारी मुंबई येथील उच्च न्यायालयाकडे जात होते. भिगवण जवळ कंटेनरची जोरदार धडक बसली. यात जबर जखमी होऊन उमेश वैद्य यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होताच सर्व अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात स्मशान शांतता होती.

जिओचा पैसा वसूल प्लान, कमी खर्चात मिळवा मोठी वैधता, अनलिमिटेड कॉलिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here