Authored by Maharashtra Times | Updated: Jul 20, 2022, 8:47 PM

लॉर्ड्सच्या मैदानात खेळताना आता पुजाराने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत हा पराक्रम भारताच्या एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. चेतेश्वर पुजाराची ससेक्सच्या कर्णधारपदी निवडही करण्यात आली आहे. पुजारा हा या सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता आणि त्याने यावेळी कर्णधाराला साजेसा खेळ केला आहे. पुजाराने कोणता विक्रम केला, पाहा….

 

Cheteshwar Pujara
चेतेश्वर पुजारा (सौजन्य-ट्विटर)
लंडन : चेतेश्वर पुजाराने आज एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारण आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला हा पराक्रम करता आला नव्हता. पण पुजाराने आता ही मोठी कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.

भाराताच इंग्लंडचा दौरा आटोपला आहे. पण पुजारा मात्र अजूनही इंग्लंडमध्ये आहे. पुजारा हा इंग्लंडमधील ससेक्स या कौंटी संघाकडून खेळत आहे. सध्या ससेक्सआणि मिडलसेक्स यांचा कौंटी सामना सुरु आहे. क्रिकेटची पंढरी म्हणजेच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या सामन्यात पुजाराने धडाकेबाज द्विशतक झळकाले आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला लॉर्ड्सच्या मैदानात द्विशतक झळकाता आलेले नाही. यापूर्वी भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विनू मंकड यांच्या नावावर होता. विनू मंकड यांनी इंग्लंडविरुद्ध १९ जून १९५२ साली कसोटी सामना खेळताना १८४ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर या मैदानातील दुसरी सर्वोत्तम खेळी ही दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर होती, त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळताना १५७ धावा करता आल्या होत्या. पण या मैदानात आतापर्यंत एकाही भारताच्या क्रिकेटपटूला द्विशतक झळकावता आले नव्हते. पण हा पराक्रम आता पुजाराच्या नावावर झाला आहे. पुजाराने या सामन्यात २१ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर २३१ धावांची खेळी साकारली

पुजाराची ससेक्सच्या कर्णधारपदी निवडही करण्यात आली आहे. पुजारा हा या सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता आणि त्याने यावेळी कर्णधाराला साजेसा खेळ केला आहे. संघाच्या अखेरच्या फलंदाजाला सोबत घेऊनही तो फलंदाजी करत होता. त्याचबरोबर या डावात ससेक्सच्या संघाकडून सर्वाधिक स्ट्राइक रेटही पुजाराच्या नावावर होते. काही दिवसांपूर्वी पुजाराला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले होते. पण इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेत त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. या सामन्यात पुजाराने चांगली फलंदाजी केली होती. पण भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नव्हता आणि त्यामुळेच त्यांना मालिकेत २-२ अशी बरोबरी साधावी लागली होती.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cheteshwar pujara becomes the first ever indian cricketer to score a double century at the prestigious lord’s cricket ground.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here