मुंबई : कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या नावाखाली भाजप आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांच्याकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र यातील विशेष योगायोग म्हणजे राहुल कुल आणि जयकुमार गोरे या दोघांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचारसभांमध्ये दिलं होतं. परंतु त्यानंतर फडणवीसांची सत्ता पुन्हा आली नाही आणि आश्वासनपूर्तीची शक्यताही मावळली. मात्र आता फडणवीसांकडे संधी चालून आली आहे. त्यामुळे कुल आणि गोरे यांच्यासह समर्थक-मतदारांना दिलेला शब्द फडणवीस पूर्ण करणार का, याची उत्सुकता लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक-दोन नव्हे, तर भाजपच्या तब्बल ७ उमेदवारांना आश्वासन दिलं होतं. सत्ता आल्यावर मंत्री करण्याची घोषणा फडणवीसांनी प्रचारसभांमध्ये केली होती. संबंधित उमेदवाराला निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो, असं फडणवीस त्या-त्या उमेदवाराच्या प्रचारसभेत म्हणाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात संबंधित सात ‘भावी’ मंत्र्यांपैकी चौघा जणांना जनतेने नाकारल्याने त्यांचा प्रश्न मिटला. तर तिघा उमेदवारांना मंत्री करण्याबाबत दिलेला शब्द सरकार स्थापन न झाल्यामुळे अपूर्णच राहिला.

कोणाकोणाला दिला होता शब्द?

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, माण-खटावमध्ये जयकुमार गोरे, यवतमाळमध्ये निलय नाईक, पुसदमधून राहुल आहेर, पुरंदरमधून विजय शिवतारे, मावळमधून बाळा भेगडे यांना आणि दौंडमधून राहुल कुल यांना मंत्री बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

१०० कोटींच्या मोबदल्यात मंत्रिपद, राहुल कुल-जयकुमार गोरेंना ऑफर, फडणवीसांनी पावलं उचलताच…
विजयी कोण झालं?

जयकुमार गोरे
राहुल आहेर
राहुल कुल

पराभूत कोण झालं?

राम शिंदे
निलय नाईक
विजय शिवतारे
बाळा भेगडे

हेही वाचा : ठाकरेंपाठोपाठ पवारांनाही झटका? फडणवीसांची फील्डिंग, सुप्रिया सुळेंना टेंशन!

विशेष म्हणजे, राम शिंदे हे विधानसभेला पराभूत झाले असले, तरी भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. त्यामुळे तेही मंत्रिपदाच्या शर्यतीत असू शकतात. माजी मंत्री विजय शिवतारे पराभूत झाले, मात्र आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

फडणवीस यांनी कुल यांच्या प्रचारार्थ 17 ऑक्टोबरला चौफुला येथे सभा घेतली होती. “महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना २०१४ पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा. मी त्यांना मंत्री करतो. राहुल कुल यांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे तुम्ही विकासाची काळजी करू नका.” कुल निवडून आल्यानंतर येथील लोकलचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो, असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

हेही वाचा : एकदम ओक्के कार्यक्रम, खांद्यावर महिलेचं डोकं, चित्रा वाघ म्हणाल्या, काय नाना, तुम्ही पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here