ambulance crash at toll booth in karnataka: कर्नाटकच्या शिरुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. उडुपी जिल्ह्यातील शिरुर गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलेल्या रुग्णवाहिकेनं थेट टोलनाक्याला धडक दिली.

 

shirur accident
शिरूरमध्ये रुग्णवाहिकेचा भीषण अपघात
शिरुर: कर्नाटकच्या शिरुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. उडुपी जिल्ह्यातील शिरुर गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलेल्या रुग्णवाहिकेनं थेट टोलनाक्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा उघडून काहीजण बाहेर फेकले गेले.

भरधाव वेगानं निघालेल्या रुग्णवाहिकेवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. ही रुग्णवाहिका टोलनाक्याला धडकली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. यातील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्राणज्योत रुग्णालयात मालवली. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला अपघाताचा व्हिडीओ २२ सेकंदांचा आहे. त्यात टोलनाक्यावरील कर्मचारी दिसतात. दुरुन येत असलेली रुग्णवाहिका पाहून ते टोलनाक्यावरील बॅरिकेड्स हटवू लागतात. त्यांची धावपळ व्हिडीओमध्ये दिसते. थोड्याच वेळात रुग्णवाहिका टोलनाक्यावर पोहोचते. भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेवरील चालकाचं नियंत्रण सुटतं आणि ती टोलनाक्यावर धडकते. रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा अपघातामुळे उघडतो आणि आतमधील अनेकजण बाहेर फेकले जातात.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : on camera massive ambulance crash at toll booth in karnataka 3 died
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here