कुऱ्हाडीने वार करून युवकाने आईच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे.

 

killed with axe
संग्रहित छायाचित्र
नागपूर: कुऱ्हाडीने वार करून युवकाने आईच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे. खुशाल (वय २५) असे मृतकाचे, तर सूर्या (वय २३) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव (दोघांची नावे बदललेली) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशालचे सूर्याच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल सूर्याला समजले. प्रेमसंबंध संपुष्टात आणले नाही तर, तुला ठार मारेन,अशी धमकी त्याने खुशालला दिली होती. खुशालने त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी खुशाल हा घरी एकटा होता. सूर्या त्याच्या घरी गेला. त्याने खुशालसोबत वाद घातला. कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार केले.
शिरुरमध्ये भीषण अपघात! रुग्णवाहिकेची टोलनाक्याला जोरदार धडक; आतली माणसं बाहेर फेकली गेली
जखमी झालेला खुशाल खाली कोसळला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर सूर्या पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सूर्याला अटक केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : 23 year old son killed his mothers 25 year old lover with axe in nagpur
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here