मिळालेल्या माहितीनुसार, रंगा मडावी हे दुपारच्या वेळी मन्नेराजाराम वरून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मडवेली येथे जात होते. रस्त्यावरच नक्षल्यांनी गोळी घालून त्यांची हत्या केली. सदर गाव हे दामरंचा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ५ एप्रिल रोजी मन्नेराजाराम येथे मीना सिडाम या तरुणीचा गावालगतच मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सदर मुलगी २९ मार्च पासून बेपत्ता होती. तिची हत्या याच माजी सरपंच असलेल्या रंगा मडावीच्या मुलाने केली होती. सध्या तो तुरुंगात असून याच प्रकरणामुळे रंगा मडावी यांची हत्या झाली असेल अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याचा मागील दहा दिवसांत दोनदा संपर्क तुटला होता. काल १९ जुलैपासून भामरागड तालुका मुख्यालयातील रहदारी सुरू झाली. आज २० जुलैला ही घटना घडल्याने तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.