नितीन हे आपल्या ताब्यातील एसटी बस घेवून कशेडी वाहतूक पोलीस केंद्रानजीकच्या तपासणी नाक्याजवळ गेले होते. या ठिकाणी मुंबईहून गावी परतणाऱ्या चाकरमान्यांना थांबवण्यात येत असून या नागरिकांना लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात एसटी बसने पोहचवण्यात येत आहे. तिथे ज्या बस पाठवण्यात आली आहे त्यावर नितीन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आज सकाळी अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांना तातडीने उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या एक वर्षापूर्वीच नितीन हे एसटी महामंडळाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यादरम्यानच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने भरणे परिसरावर शोककळा पसरली आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines