सियाचिनमधील; तसेच काश्मीरमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी तिथे ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे योगेश चिथडे (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले.

 

yogesh
म. टा. प्रतिनिधी, पुणेः सियाचिनमधील; तसेच काश्मीरमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी तिथे ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे योगेश चिथडे (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, बहीण, पत्नी सुमेधा, मुलगा हृषीकेश असा परिवार आहे. चिथडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच सायंकाळी उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. योगेश सुरुवातीला हवाई दलात कार्यरत होते. तेथील आठ वर्षांच्या सेवेनंतर ते स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये रुजू झाले. तिथल्या कर्मचारी संघटनेत ते सक्रिय होते. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी समाजाने काही तरी केले पाहिजे, या भावनेतून १९९९मध्ये पत्नी सुमेधा यांच्या साथीने त्यांनी ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ची (सिर्फ) स्थापना केली.

हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना मदत करणे, वीरनारींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. स्वतःच्या आर्थिक योगदानाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून निधी जमवून त्यांनी सियाचिन; तसेच कूपवाडा येथे लष्करासाठी दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह तत्कालिन लष्करप्रमुखांनीही त्यांना गौरवले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : oxygen generation plant founder yogesh chithade passed away
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here