मुंबई- ” हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. मालिकेतलं प्रत्येक पात्र नेहमीच चर्चेत असते, परंतु TMKOC चा उर्फ सध्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. होय, निधीने नवीन हेअरस्टाइल केली असून यात तिला ओळखणंही कठीण झालं. हे आम्ही नाही तर तिचे चाहते सोशल मीडियावर असं म्हणत आहेत. सोनू भिडे उर्फ निधीने फोटोशूट करत तिचा नवा लूक चाहत्यांना दाखवला, यात ती पूर्णपणे नवीन निधी दिसत आहे असंच लोक म्हणत आहेत.

निधीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये सोनू होऊन प्रसिद्धी मिळवली होती. तिचं पात्र चाहत्यांना खूप आवडलं होतं आणि ती त्याच नावाने घराघरात प्रसिद्ध झाली. सध्या निधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. कधी व्हेकेशनच्या फोटोंमुळे तर कधी सतत बदलत्या लूकमुळे ती चर्चेत असते. गेल्या मंगळवारी, निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती हॉट पँट आणि टॉपमध्ये दिसत असून तिने बॉयकट केला आहे. याआधी निधीचे केस लांब असायचे.

निधी भानुशालीच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडला नाही आणि त्यांनी कमेन्टमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. चाहत्यांनी लिहिले की, तू स्ट्रेंजर थिंग्जची इलेव्हनसारखी दिसत आहेस. तर अजून एकाने लिहिले की, ‘तुझे केस कुठे गेले’ त्याचबरोबर काही युझर्सनी निधीच्या लूकचं खूप कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here