sonia gandhi ed news : काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर होतील.

 

Sonia Gandhi
सोनिया गांधी

हायलाइट्स:

  • सोनिया गांधी ईडी चौकशीला जाणार
  • सकाळी ११ वाजता उपस्थित राहणार
  • नॅशन हेरॉल्ड प्रकरणी चौकशी
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी समन्स बजावलं होतं. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची यापूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांना करोना संसर्ग झाल्यानं प्रकृतीच्या कारणामुळं चौकशीला उपस्थित राहण्याची नवी तारीख मागितली होती. ईडीनं सोनिया गांधी यांना चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचं समन्स दिलं होतं, त्याप्रमाणं त्या सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित राहतील. सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जाणार आहेत.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी
ईडी सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. सोनिया गांधी यांची इन कॅमेरा चौकशी केली जाणार आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ईडी लेखी जबाब घेणार आहे. ईडीनं या प्रकरणाची फाईल २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र, पुन्हा एकदा ईडी चौकशीला सुरुवात केली आहे.
Explainer: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा गांधी घराण्याशी संबंध काय?; सोप्या शब्दांत समजून घ्या
काँग्रेस देशभर आंदोलन करणार, पोलीस सतर्क
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेसकडून ईडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येण्याची शक्यता असल्यानं पोलीस सतर्क झाल्या आहेत. काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथे पोलिसांनी बॅरिकेटस लावले आहेत.
थेट नगराध्यक्षपदाचा निर्णय भाजपच्या अंगलट, सात नगरपालिकांमधील सत्ता गमावली, काँग्रेसला लॉटरी
काय आहे प्रकरण?
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती.
मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार? भाजपच्या ६ दिग्गजांसह एकूण ३० मंत्री शपथ घेण्याची शक्यता

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sonia gandhi in ed office news in national herald case congress protest in delhi
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here